Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

मनोगत

         खूप  दिवसांपासून मनात होतं, लिहीतं व्हावं.आज उद्या करत तसंच राहून गेलं. आणि आज निश्चयानेच ही सुरूवात केली.                                                                 माझ्या  कामाच्या निमित्ताने खूप ओळखी झाल्या. वेगवेगळी माणसे भेटली. चांगल्या वाईट अनुभवातून जीवन अधिकाधिक समृद्ध होत गेलं.खूप गोष्टी शिकता आल्या. माणसं वाचता यायला लागली. माझ्याही नकळत माझ्यात झालेले बरे वाईट बदल बरेचदा मलाच पचवायला जड होतात. म्हणूनच स्वत:शीच स्वत: व्यक्त होण्याची ही  आधुनिक सोय.